cover

वॅलेन्टाइन्सडे हा दिवस प्रेमाचा दिवस या नावाने हि ओळखला जातो. परंतु हे प्रेम नुसत तरुण तरुणी ( कपल्स ) प्रयन्तच मर्यादित नसून तर हा प्रेम साजरा करण्याचा दिवस सगळ्यांसाठीच असतो. तर मग हे प्रेम आई-वडील,भाऊ-बहीण, मित्रं-मैत्रिणी असे सगळेच साजरे करू शकतात. वॅलेन्टाईनडे म्हणजेच काय तर या दिवशी आपण एकमेकांवर किती प्रेम करतो ते दाखवून देणारा दिवस. मग ते कोणी फुले देऊन,कोणी चॉकलेट्स देऊन तर कोणी सॉफ्ट टॉइझ देऊन साजरा करतात. हे प्रेम फक्त कपल्स पुरताच मर्यादित नसून तर हे प्रेम आपण कोणासाठीही दाखवू शकतो. तसेच या दिवसाच्या नावाने अनेक मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात.

खरा पाहता आपण आपल्या भावना या दिवशी काहीतरी एकमेकांना देऊनच सध्या करायला हव्यात असे नव्हे तर त्या भावना शुद्ध असणं जास्त गरजेचं आहे. आणि असा हा दिवस आपण कुठल्या तरी एकाच दिवशी नव्हे तर प्रत्येक दिवशी साजरा केला पाहिजे.

हल्ली युवा पिढी मध्ये हा दिवस अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा मानला जातो. बहुतेक जण नववर्ष्याची सुरवात झाल्यावर या वॅलेन्टाइन्सडे ची आतुरतेने वाट पाहत असतात. मुलांमध्ये मी या वर्षी या मुलीला प्रोपोस करणार तर मुलींमध्ये मला या वर्षी कोण प्रोपोस करणार अशी मनतरंग चालू असतात. तसेच प्रत्येक दिवशी वॅलेन्टाइन्सडेचे दिवस सुरु झाले कि नवनवीन ड्रेससेस घालणे, रंग ठरवणे, तर कोण कोणाला काय देणार याची चर्चा करणे.असे हे प्रत्येक दिवस साजरे केले जातात. जसे रोझ डे ला रोझ देणे, चॉकलेट डे ला चॉकलेट देणे, तर टेडी डे ला टेडी देऊन असे हे दिवस साजरे केले जातात.

हा सर्व खर्च एका दिवसासाठी करण्यापेक्षा तोच दिवस आपण मनापासून भावना शुद्ध ठेवून रोज साजरा करू शकतो या खर्चिक गोष्टी न घेता. खरा पाहायला गेला तर आयुष्यात या तात्पुरत्या गोष्टी महत्वाच्या नाहीत तर नातं कोणतेही असो परंतु ते टिकवणे आणि जपवने जास्त महत्वाचे असते.