cover

भिवंडी आगारात रिक्षाचालकांच्या मारहाणीत बसचालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त बसचालकांचा आगारातील निषेधामुळे बससेवा ठप्प. भिवंडी आगारात ठाणे-भिवंडी अशी शेवटची फेरी करून बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आगारात बस आणताना आगारात उभ्या असलेल्याला एका रिक्षाला धक्का लागल्यामुळे त्या रिक्षाचालकाने बसचालक प्रभाकर गायकवाड याला शिवीगाळ केली. बसचालकाने काहीही ना बोलता प्रवाश्याना उतरण्यासाठी बस आगारात नेली आणि वाहक पैसे देण्यास कार्यालयात गेले असताना गायकवाड रिक्षाचालकाला जाब विचारण्यास गेले तेव्हा रिक्षाचालकांनी तेथे त्यांची बेदम मारहाण केली.

घडलेल्या प्रकारामुळे प्रभाकर गायकवाड शिवाजीनगर येथील पोलीस स्टेशनातं तक्रार नोंदवण्यास गेले परंतु कोणीही त्यांची तक्रार घेतली नाही. त्यामुळे अत्यंत मनस्तापामुळे ते तिथेच बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात नेत असताना वाटतच त्यांचा मृत्यू झाला. हि बाब कळताच संपूर्ण बस चालकांनी संतप्त होऊन या गोष्टीचा निषेद करत जागोजागी एसटी स्थानकात वा बस आगारात आंदोलन केले. हि बातमी पसरल्यामुळे ठाणे भिवंडी तसेच नांदेड जळगाव अश्या बऱ्याच ठिकाणी आज एसटी सेवा सकाळी बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान प्रवाश्यांचे बरेच हाल झाले. त्यामुळे प्रश्यांची गैरसोय आणि बससेवा विस्कळीत झाल्याचे दिसून येते.. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.