cover
Thinvent Technologies Pvt. Ltd.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात रेल्वेने प्रवास करताना रेल्वेच्या तिकिटासाठी कंटाळवाणी लाइन आता कमी होणार आहे. रोज लांबवर लागणाऱ्या तिकिटाच्या लाइनवर नियंत्रण ठेवण्यासाठी एप्रिल २०१६ मध्ये रेल्वे प्रशासनाने त्या दृष्टीने काम करण्यास सुरवात केली आहे. रेल्वेची जनरल तिकीटे आता बँकेत मिळणे शक्य होणार आहे. त्यासाठी ATM मशीनमध्ये तिकिट वाटप यंत्राना जोडली जाईल किंवा बँकेत व्हेंडिंग मशीन बसवली जावी अशी तरतूद केली जाणार आहे. जेणेकरून प्रवाश्याना लाईनीत उभे न राहता सहजरित्या तिकीट उपलब्ध होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन स्टेट बँक ऑफ इंडियाशी चर्चा करत आहे. एप्रिल २०१७ पर्यंत हि योजना सुरु होईल असा अंदाज बांधला जातो.