cover

आजवर जगात पैसे हा अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांपेक्षाहि जास्त गरजेचा झालेला आहे. आपण पाहता आज पैसे हि अशी गोष्ट आहे कि ज्या व्यक्तीकडे खूप आहे तो श्रेष्ठ मानला जातो. बरेच लोक त्यांचा आजूबाजूला दिसतात . आज प्रतयेक क्षेत्रात अधिक पैसे मिळवण्याची हाव हि प्रत्येकाला असल्याची दिसून येते.तसाच तो चुकीचा मार्गानेहि मिळवला जातो. आणि त्यासाठी काहीही करण्याच्या अभावी जाणारी बरीचशी पिढी आजवर पाहण्यास मिळते. त्यातील या काळ्या पैशामध्ये मागासलेले लोक आणि त्यांची विचित्र वृत्ती पाहण्यास मिळते. त्यामुळे त्या गोष्टींचा विपरीत परिणाम त्यांचा मुलांवर आणि त्यांचा संगोपन व संस्कार यांवर होत असल्याचे दिसून येते.

जीवनात जशी प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते तशीच पैसाही मर्यादा असावी. आपण आपल्या विकासासाठी आणि त्या व्यतिरिक्त आपल्या नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी पैसे कमावतो. जेवढ मिळवतो त्यात माणसांनी समाधानी राहून त्याचा आनंद घेतला पाहिजे. फक्त तो अधिका-अधिक मिळवून त्या हव्यासा पोटी आपल्या आनंदला, सुखाला विरक्त करू नये.

पैसा हा तितकाच महत्वाचा आहे जेवढा त्याचा उपयोग आपल्या मूलभूत गरज भागवण्यासाठी होतो. परंतु प्रमाणापेक्षा जास्त पैश्याची हाव बाळगू नये. आनंदी व सुखी जीवन जगायचे असेल तर आपले कर्म करत राहून , आहे त्यात समाधानी राहणे गरजेचे आहे. आणि ह्या पैश्याचा अभावी कुठेतरी विरक्त होत असलेली नाती,आपुलकी, दुसर्यांबद्दल प्रेम, जिव्हाळा याना कुठेतरी आपण फुंकर घालणे आवश्यक आहे. त्यामुळेच समाजात आपली प्रतिष्टा, नाव, आब्रू, मान मर्यादा कायम राहील.आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक गोष्टी जपल्या जातील.समाजातील लोक पुन्हा एकोप्याने राहजतील. त्यामुळेच जीवनात सर्वाधिक प्राधान्य पैश्याला देण्यापेक्षा माणसाला (माणुसकीला) दिले पाहिजे. पैश्याने फक्त सुविधा उपलब्ध होतात तर, माणुसकीची साथ नाही...