cover

जीवन हे मानवी जीवाला मिळालेले मोल्ल्यवान पैलूच आहे असे म्हणायला काही हरकत नाही. हि मानवी जीवावर झालेली दैवी कृपाच म्हणावी. वस्तुतः बघता या पृथ्वी तलावर जन्मलेल्या प्रत्येक जीवाला जणू याची कल्पना असावी कि जीवन म्हणजे काय ? प्राणी मात्रांपासून ते मानवी शरीरापर्यन्त सगळयांनाच याव्हा वरदान आहे. प्राणिमात्रांना कमी मर्यादेपर्यन्त हे जीवन जगणायचे सुख लाभते तर मानुषयाला मात्र बरीच मर्यादा आहे. त्या मर्यादेचा पुरेपूर वापर करून मानुषयाने आजवर बरीचशी प्रगती केलेली आपणास दिसून येते.

जीवन म्हणजे काय तर, जीवन म्हणजे हि एक अशी गोष्ट आहे कि ज्यात प्रवास करताना मार्गात बरेचसे सुख आणि दुःखाचे खेळ बघायला मिळतात. मानवी जीवनाचा हा प्रवास असाच घडयाळाच्या ठोक्या प्रमाणे चालू राहतो. सकाळी उठण्या पासून ते रात्री झोपेपर्यन्त सतत त्याच गतीने त्याच गोष्टी परंतु अचानक एखाद वेळी आपल्या नकळत अश्या गोष्टी घडून जातात कि क्षणात आपले जीवन पालटून टाकतात. त्या मधील काही क्षण असतात ते दुःखाचे व सुखाचे,आनंदाचे. क्षणार्धात कधी जीवन बदलून जाते त्याची पूर्व कल्पनाही मिळत नाही आणि हेच क्षण आयुष्यात आपणास बरच काही सांगून जातात. हेच अनुभव आपणास एखाद्या गुरु प्रमाणे जीवनात चांगले आणि वाईट अश्या दुहेरी गोष्टींचा सहवास घडवून आणतात.

वेळ कुणासाठी थांबत नसते त्यामुळे हि वेळच आपणास निच्चीत वेळ आल्यावर बऱ्याच काही गोष्टींचा सहवास देऊन बरचसं शिकवून जाते. आणि हि वेळच माणसाला जीवन जगण्याच मोठ रहस्य सांगून जाते.

त्यामुळेच म्हणतात ना जीवनात वेळेला फार महत्व दिलेल आहे
वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्त्खणततेने वाट पाहत असतो,
वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो,
वेळ अगदी कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो,
वेळ जात जात नाही जेव्हा आपण दुखी असतो,
प्रतयेक वेळी वेळ आपल्या सोईनुसार येत नाही, त्यामुळेच वेळोवेळी आनंदी राहा.