cover

लहानपणापासून आपण नेहमी आई हेच सर्वात श्रेष्ठ दैवत आहे,आणि स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असेच शब्दप्रयोग आणि अश्याच गोष्टी ऐकत आलो आहोत. परंतु बाबांवर कोणी जास्त म्हंटलेले नाही.आपणास आई जेवढी महत्वाची असते तेवढेच बाबा हि महत्वाचे असतात.

बाबा म्हणजे काय, तर आपणास आयुष्यभराची साथ, पाठिंबा, दिलासा, संस्कार, भीती आणि अश्या बऱ्याच भावनांनी एकवटलेले बाबा. हे जग आपण आजवर पाहतोय ते फक्त आपल्या बाबांमुळेच. बाबा आहेत म्हणून आपले हे इवलेशे जग आहे. बाबा आहेत म्हणून आपल्या इच्छा,महत्वाकांक्षा आहेत. बाबा आहेत म्हणून आनंद आहे, बाबा म्ह्णाणजेच अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हात. बिकट परिसरातीमध्ये मिळालेला आधार,पाठिंबा आणि पूर्ण जग आपल्या विरोधतात असला तरी कुठेतरी मणी असलेला तो आत्मविश्वास म्हणजेच बाबा आपले संपूर्ण जग.

लहानपणी केलेला तो खेळण्यांसाठी हट्ट आणि तो हट्ट पूर्ण करणारे ते आपले बाबा.घरातील बराचसा खर्च,जबाबदारी या संपूर्ण गोष्टी पडदयाआड घालून आपल्या इच्छा पुरवणारे ते बाबा. आपल्या मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी झटपट करणारे ते बाबा. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी,आनंदासाठी आणि त्याला हव्या त्या सुखसोई उपलब्ध करून देणारे ते बाबाच.

बाबा नाहीत तर ती खेळणी नाहीत. ती खेळणी नाहीत तर ती खेळण्याची मज्जा नाही. ती मज्जा नाही तर तो आंनद नाही. तो आनंद नाही तर ते सुख नाही. ते सुख नाही तर ते जीवन नाही, आणि ते जीवन नाही तर आपले जगच नाही...