cover

परीक्षा संपल्यानंतर आता जिथे तिथे सगळे जन मज्जा करताना दिसत असतील. दिवस भर खेळणे किवा इकडे तिकडे फिरणे हे वातावरण आता तुम्हाला सगळ्या जागेवर दिसत असेल. खरच लहान पणा पासून आपल्याला नेहमी वाटायचे कि कधी ती शाळा संपते आणि कधी आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी मिळते ते. कदाचित आता पण आपले सगळे लहान मित्र असेच विचार करत असतील. शाळेत असताना नेहमी सुट्टी लागल्यावर आपण मामांच्या गावाला जायचो, पण जस-जसे आपण मोठे होत आलो तस-तसे मामांच्या गावाला जायचे देखील कमी झाले. सगळ्यांनाच कमी वेळात भरपूर यश हवे असते मग त्यासाठी आपण आपली १० वि ची परीक्षा झाल्या नंतरच आपण लगेच ह्या नाही तर त्या कलासेस किवा कोर्सेस करताना दिसतील. आपल्याला नेहमी पाहिजे असते कि आपण ऑलराऊंडर वाहावे आणि सगळ्यान पेक्षा पुढे जावे. सगळेच जन गोंधळून जातात कि आपण पुढच्या आयुष्यात काय करावे आपण ह्यांचा किवा त्यांचा सल्ला घेत असतो कि काय करावे. नेहमी मोठ्यांचा सल्ला घेणे हे आपल्याला सांगण्यात आले आहे . सध्या मार्केट मध्ये तुम्हाला नेहमी भेटेल हा किवा तो कॉउंसिलिंग करणारा, पण कदाचित त्या कॉउंसिलिंग साठी ते तुमच्या कडून पैसे घेत असतील. पण नक्कीच शेवटचा वर्षयाला जाताना सगळेच गोंधळले जातात. कि मी मार्केटिंग घेऊ का कि प्रोडूकशन घेऊ. तेच बॅचलर ऑफ मास मीडिया मध्ये देखील शेवटच्या वर्षाला पत्रकारिता (Journalism) घेऊ कि जाहिरात (Advertising) असा प्रश्न पडतो. हे सगळे गोंधळ संपवण्यासाठी आपण कॉऊन्सेलर कडे जातो आणि भरमसाठ पैसे देतो, हे सगळे वगळण्यासाठी कॉलेजान मध्ये कॉलेज मधले शिक्षक असे कॉउंसिलिंगचे वर्ग घेताना दिसत आहे, जेणेकरून मुल आपल्या आवडी निवडी मन मोकळे करून बोलतील,ह्यात कॉलेज चे शिक्षक विद्यार्थ्यांना काही इंटर्नशिप करण्या साठी मदत देखील करतात.तसेच आता कॉलेज संपल्या वर असे हेकॉउंसिलिंग बहुतांश कॉलेज मध्ये सुरु होतात.