cover

चित्रपट सृष्टीचा दुनियेत आपणास रोजच वेग-वेगळ्या गोष्टी पाहण्यास मिळतात. तसेच २० जानेवारी ,२०१७ म्हणजेच गेल्या शुक्रवारी दोन चित्रपट पडद्यावर आले. त्यामधील एक रईस शारुख खानचा तर दुसरा काबील हृतिक रोशनचा. खरे पाहता दोन्ही चित्रपट एकाच दिवशी पडद्यावर आल्यामुळे दोन्हींमध्ये चढाओढ सुरु झाली. तर हे दोन्ही चित्रपट एकमेकाना दमदार टक्कर देत असल्याचे दिसून आले. याचे कारण शारुख खान आणि हृतिक रोशन यांचे बरेचसे फॅन्स.

रईस या चित्रपटात शारुख खान एका वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाची भूमिका करत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये पहिल्यांदाच शारुख खान ने एका गँगस्टर ची भूमिका निभावली असल्यामुळे त्याचा बऱ्याचशा प्रियकरांना त्याचा हा नवीन लुक आणि नवीन अभिनय अतिशय आवडला. तसेच या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहीर खान,नवाजउद्दीन सिद्देगी, सनी लिओनी असे बरेचसे वक्त्यीमत्त्व आणि त्यांची भूमिका पाहण्यासाठी अनेक प्रियजनांची झुम्बड उडाली. तसेच चित्रपटातील कथा, संवाद, पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन्स साजेशे असल्यामुळे हा चित्रपट अगदी सुंदर झालाय. तसेच पाहता काबील या चित्रपटात हृतिक रोशन आणि यामी गौतम यांनी अंधत्व्याची भूमिका निभावून एक वेगळीच प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून सादर केली आहे. त्यामुळे बर्याचश्या लोकांना हाही चित्रपट आवडलेला आहे.

रईस या चित्रपटात एका गॅंगस्टरची गोष्ट सादर करण्यात आलेली आहे तर काबील या चितपटातून महिलांचा संम्मान करणे आवश्यक असल्याचे दाकवुन दिले आहे.
परंतु आजवर पाहता बॉक्स ऑफिसवर काबील पेक्षा रईस चित्रपटाने बाजी मारल्याचे दिसून येते. रईसने ४६ कोटी रुपये कमावले असून त्याचा तुलनेत काबीलने २५ कोटी रुपये कमावल्याचे दिसते. त्यामुळे दोन्ही चित्रपटांचा तुलनेत शारुख खानचा रईस चित्रपटाचा पगडा जास्त भारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे रईस हा सिनेमा हिट झालंय.