cover

सुट्टी म्हटली तर पहिला विचार मनात येतो ते म्हणजे आज दिवस भर आपण आराम करूया. सुट्टी हि कोणाला खूप आवडते तर कोणाला नाही, सगळ्यान साठी सुट्टी ची एक वेगळीच ओळख आहे. कोणाला सुट्टी आवडते कारण त्यांना एक दिवस आराम करायला मिळतो. पण बहुतांश लोकांना सुट्टी हि खूप बोरिंग वाटते कारण त्या दिवशी अस काही वेगळ घडतच नाही.

सुट्टी म्हटली कि सगळेच जन सकाळी उशिरा पर्यंत झोपून राहतात, मग उठून हळू हळू आपली कामं चालू असतात, कदाचित ह्याच सुट्टी मुळे आपण खूप आळशी बनत चाललो आहे. जग किती पुढे चाललं आहे आणि आपण ह्या आळशी पणा मुळे नक्कीच कुठे तरी मागे पडलो आहे. जर आजच्या युथ ची गोष्ट घेतली तर त्यांना सुट्टी हि खूप बोरिंग वाटते. सर्वात मोठ कारण म्हणजे ह्या आपल्याला ह्या सुट्टी च्या दिवशी मज्जा मस्ती हि नाही करायला मिळत. बघून बघून टीव्ही किती वेळ बघ्नर. मित्रां सोबत दिवस भर इकडून तिकडे भटकण हे खाणं ते खान ह्या मुली ला बघ त्या मुली ला बघ असाच त्याचं चालू असत. काही न त्यांच्या प्रियजनांना भेत्याच असत ह्या सुट्टी कारण त्यांना भेटायला मिळत नाही. कारण घरी काय सांगणार कुठे चाललो आहे ते आणि नाही त्या चांभार चौकश्या. पण जर तेच कॉलेज असत तर आपण सांगतो कि कॉलेज आहे आणि तेव्हा कोणच नसत आपल्याला जास्त प्रश्न विचारायला.

सुट्टी असली कि आपण घरीच पडलेलो असतो, आणि हे आपलं घरी राहणं आपल्या घरच्यांना आवडत नाही. मग त्याचं सतत एकंच चालू असत काही तरी काम कर दोन पैसे कमवा किवा घरातली कामं करा. जर तेवढ्या कोणत्या मित्राचा फोन आला तर लगेच टोमणे चालू होतात झाला हा मोठा इंजिनीर वगेरे. हफ्त्यातून एक सुट्टी तरी असायला हवी, पण हे vacation म्हटलं तर डोक्याला तापाच अस्तो. आपण ह्या सुट्टी च्या वेळेत काही हि केले ते कोणाला हि आवडत नाही. जर ह्या सुट्टी मध्ये आपण कोणाला फिरताना दिसलो तर बाहेर च्या लोकांना वाटत कि हा मुलगा खूप वाईट आहे वगेरे, आणि तेच कॉलेज ची बॅग घेऊन फिरताना दिसलो तर लगेच त्यांना वाटत कि हा मुलगा किती मेहनत करतो ते. त्या पेक्षा कॉलेज असला तर तेवढाच करमणूक होऊन जाते आणि त्यात ह्या सुट्टीन मुळे आपल्या पॉकेट मनी चे वांदे होतात, सुट्टी म्हटली तर घरातून पैसे मिळत नाही आणि पैसे साठी विचारल्यास काय गरज आहे घरीच असतो दिवस भर बोलून पैसे पण मिळत नाही. ह्याच सुट्टी च्या वेळेस मित्रान सोबत फिरायला जायच असेल तर हजार कारण द्यावी लागतात. जर विचार केला कोणता तरी कोर्सस करूया एक महिना तर ते सुद्धा जमत नाही. खरच ह्या सुट्टी मुळे आपली सगळ्याच बाजूने पंचाईत होते.

पण खरेच जी मज्जा कॉलेज बंक करून फिरण्या मध्ये असते ती मज्जा ह्या सुट्ट्यांमध्ये नाही करता येत.