cover
FOX STAR STUDIOS

चित्रपटश्रुष्टीमध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या भुताखेतांच्या गोष्टी आणि त्या संबंधीत चित्रपट नेहमीच पाहत आलेलो आहोत. परंतु फिल्लोरी हा अनुष्का चा नवा चित्रपट लवकरच पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात अनुष्का हि भुताचा अर्थात एका चेटकिणीची भूमिका सादर करत आहे. या भूमिकेमध्ये तिने एक वेगळाच अंदाज निभावला आहे. या चित्रपटात तिने पांढऱ्या नाही तर चक्क सोनेरी कॉस्ट्यूम (कपडे) परिधान केले असून त्या सोनेरी रंगाचा त्या कथेशी काहीतरी वेगळाच संबंध असल्याचे दाखवले आहे. तसेच या सिनेमात दिलजीत दोंसांस याची मुख्य भूमिका पाहण्यास मिळणार आहे.

या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि दिलजीत दोंसांस यांची वेगळीच प्रेमकथा सादर केली आहे. हा चिवत्रपट थोडा रोमॅंटिक तर थोडा कॉमेडी असा आहे. या सिनेमात झाडावर राहणारे भूत आणि त्या झाडाशि एका मुलाचे लावण्यात आलेले लग्न अशी कथा सादर करून त्या मागील अंधेश्रद्धेवरून पडदा उठवण्याचा प्रयत्न केला आहे.

तर या चित्रपटातील सिनेमेटोग्राफी, कॉस्ट्यूम, पार्श्व संगीत, लोकेशन्स या सर्वच गोष्टी प्रेक्षणीय असल्याचे दिसते त्यामुळे लवकरच या चित्रपटाचे मनोरंजक असे ट्रेलर पडद्यावर येणार आहे.